महाराष्ट्रात महिला सुरक्षेसाठी टोल-फ्री हेल्पलाइन 14490 सुरू
महाराष्ट्रात महिला सुरक्षेसाठी टोल-फ्री हेल्पलाइन 14490 सुरू
मुंबई │ राज्य महिला आयोगाने महिला सुरक्षेला प्राधान्य देत मोफत हेल्पलाइन क्रमांक 14490 सुरू केला आहे. हा क्रमांक २४x७ उपलब्ध असून राज्यातील महिलांना तक्रार नोंदवण्यासाठी तसेच मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर मदतीसाठी वापरता येणार आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, या हेल्पलाइनवर प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ आणि काउंसलर उपलब्ध असतील, ज्यामुळे महिलांना केवळ तक्रार नोंदवण्यापेक्षा भावनिक आणि कायदेशीर मार्गदर्शनही मिळेल.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही सेवा एक त्वरित, सोपी आणि प्रभावी उपाययोजना ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महिलांना छळ, हिंसा ,कौटुंबिक अत्याचार किंवा अन्य त्रासाच्या परिस्थितीत त्वरित मदत मिळावी हा उद्देश आहे.
संपूर्ण देशातील तसेच महाराष्ट्रातील महिलांसाठी हा क्रमांक मोठा दिलासा आणि सुरक्षिततेची हमी ठरेल, असा विश्वास महिला आयोगाने व्यक्त केला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

