म्हाडा पुणे मंडळाच्या घरकुल योजनांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवली
म्हाडा पुणे मंडळाच्या घरकुल योजनांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवली
पुणे : म्हाडा पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध गृहप्रकल्प व घरकुल योजनांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. अर्जदारांची वाढती संख्या आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन म्हाडाने अर्जदारांना आणखी संधी देत अर्ज व शुल्क भरण्यासाठी अतिरिक्त कालावधी दिला आहे.म्हाडाच्या अधिकृत पत्रकानुसार, अर्ज व शुल्क भरण्याचे अद्ययावत वेळापत्रक पुढीलप्रमाणे:ऑनलाइन अर्ज भरणे ३० नोव्हेंबर २०२५, रात्री 11.59 वाजेपर्यंत, ऑनलाइन शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०२५, रात्री 11.59 वाजेपर्यंत, RTGS / NEFT इत्यादीद्वारे शुल्क भरणे : 01 डिसेंबर नोव्हेंबर २०२५, संबंधित बँकेच्या वेळेनुसार ,म्हाडाने हे स्पष्ट केले आहे की ही मुदतवाढ अर्जदारांच्या सोयीसाठी करण्यात आलेली आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी विहित अवधीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी, पुणे