Maharashtra

मौजे हसनाबाद तालुका भोकरदन येथे ओबीसी समाज चिंतन बैठक संपन्न🙏

मौजे हसनाबाद तालुका भोकरदन येथे ओबीसी समाज चिंतन बैठक संपन्न🙏
दिनांक 16/11/2025 रोजी रविवारला मौजे हसनाबाद तालुका भोकरदन येथे राजू वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली कालिंका माता मंदिरात ओबीसी समाजाची चिंतन बैठक संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ व ओबीसी समाजचिंतक ॲड. एफ. एच सिरसाठ यांनी ओबीसी समाजाच्या प्रमुख समस्या व त्यावरील उपाय या विषयावर मार्गदर्शन करून ओबीसी समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सामाजिक जाणिवा निर्माण करून आपला सर्वांगीण विकास साधून राष्ट्राला गौरवशाली व सुदृढ राष्ट्र बनविण्यासाठी आपला सिंहाचा वाटा उचलावा असे आवाहन देखील त्यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात केले. याप्रसंगी छ. संभाजीनगर येथील बहुजनवादी जेष्ठ विचारवंत मु. एम बी. मगरे यांनी देखील आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना महापुरुषांच्या आंदोलनाचे दाखले देत साडेसहा हजार जातीत विखुरलेला भारतीय समाज भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्याला जाती कक्षेच्या बाहेर काढून तीन वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले असून त्यांना संविधानिक मूलभूत हक्काद्वारे त्यांच्या पर्याप्त प्रतिनिधित्वाची हमी ची तरतूद संविधानात करण्यात आली आहे . परंतु भारतीय संविधान लागू होऊन ईतकी वर्ष उलटून देखील सुद्धा ओबीसींची जनगणना अद्याप पर्यंत झालेली नाही. याला कारण म्हणजे सत्ताधार्याकडून भारतीय संविधानाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने झालेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने आपल्या हक्क अधिकारासाठी सामाजिक दृष्ट्या संघटित होणे ही काळाची गरज आहे असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. याप्रसंगी एन. एल. काकडे, बाबासाहेब मेंदू, गोपाळ सुरडकर, कृष्णा खेडकर, इत्यादींनी सदर बैठकी बाबत आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीस बाळकृष्ण रासने, बाबासाहेब मेंदू, गोपाळ सुरडकर, खेडकर कृष्णा खेडकर, नामदेव काकडे, बी. के मेंदू, शंकर तंगे सर, सोमेश शेटे, राजू वानखेडे, प्रभाकर गोरे, राजेश कंगले, राजू शेठ तंगे, विठ्ठल शीलवंत, महादू सुरडकर, गणपतराव मैंद, सुरेश लाठी, अंकुश सुरडकर, राम व्यवहारे, राजेश बिनोरकर यांचे सह असंख्य नागरिक उपस्थित होते. सदर बैठकीच्या यशस्वीतेसाठी बाळकृष्ण रासने बापू आणि शंकर तंगे सर यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोपाळ सुरडकर यांनी तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण रासने बापू यांनी केले. 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button