हिंदू महासभेच्या दबदब्याने प्रशासन जागे
हिंदू महासभेच्या दबदब्याने प्रशासन जागे

पुणे : रविवार पेठेत ‘अजमेरी १५०० बॉईज’या अनधिकृत फलकाविरोधात हिंदू महासभेने काल, 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी नेमके ४ वाजता खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अनेक महिन्यांपासून स्थानिकांच्या तक्रारी असूनही कारवाई न झाल्याने, महासभेने ८ दिवसांचा अल्टिमेटम देत फलक काढला नाही तर त्या ठिकाणी हिंदू महासभेचेच फलक लावण्याचा इशारा दिला होता.
तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासन तत्काळ हलले आणि अवघ्या सहा तासांत अनधिकृत फलक हटवण्यात आला.
सदर ठिकाणाला स्थानिकांनी वीस वर्षांपासून ‘फलक-बॅनर निषिद्ध क्षेत्र’ म्हणून निश्चित केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून लावलेल्या अनधिकृत फलकामुळे परिसरात नाराजी होती. प्रशासनाच्या झटपट कारवाईमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
तक्रार देताना हिंदू महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

