या हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे निधन

🕊️या हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे निधन
लंडन : हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष आणि भारतीय वंशाचे सुप्रसिद्ध उद्योगपती गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते आणि काही आठवड्यांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने उद्योगजगताला मोठा धक्का बसला आहे.
‘जीपी हिंदुजा’ या नावाने ओळखले जाणारे गोपीचंद हिंदुजा यांनी १९५९ साली मुंबईत कुटुंबाच्या व्यवसायात आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी हिंदुजा समूहाचा व्यवसाय जागतिक स्तरावर विस्तारला. मे २०२३ मध्ये मोठे बंधू श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांनी समूहाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.
हिंदुजा समूहाचा व्यवसाय बँकिंग, ऊर्जा, ऑटोमोबाईल, मीडिया, रिअल इस्टेट आणि रसायन या विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रगती साधली.
गोपीचंद हिंदुजा यांच्या निधनाने केवळ हिंदुजा कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण उद्योगजगताचा मोठा तोटा झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, पुत्र संजय व धीरज, आणि कन्या रीता असा परिवार आहे.
उद्योग आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
🖋️ प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी



