Uncategorized
10 लाखांची रोकड सापडली; कचरा वेचणाऱ्या अंजू मानेंचा प्रामाणिकपणाचा आदर्श!.
पुणे प्रतिनिधी | 10 लाखांची रोकड सापडली; कचरा वेचणाऱ्या अंजू मानेंचा प्रामाणिकपणाचा आदर्श!

क्षणभरही विचार न करता अंजू माने यांनी ही प्रचंड रक्कम जवळ ठेवण्याचा मोह न बाळगता ती लगेच मालकापर्यंत पोहोचवली.
मिळालेली हरवलेली रक्कम सुरक्षितपणे परत देत अंजू मानेंनी प्रामाणिकपणाचे खरे उदाहरण घालून दिले आहे. कठीण आर्थिक परिस्थितीत असूनही त्यांनी दाखवलेली सचोटी समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अंजू मानेंच्या या कार्याचे मोठे कौतुक केले असून, अशा प्रामाणिक व्यक्तींमुळे समाजातील विश्वास आणि मानवतेची भावना अधिक दृढ होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे