वुई टुगेदर फाउंडेशनचा निस्वार्थी दिवाळी उपक्रम
वुई टुगेदर फाउंडेशनचा निस्वार्थी दिवाळी उपक्रम
कष्टकरी महिलांना फराळ, मिठाई, पणती आणि रोख रक्कम देऊन सन्मान

पिंपरी –
वुई टुगेदर फाउंडेशन नेहमीच निस्वार्थी सेवेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही फाउंडेशनने एक आगळावेगळा उपक्रम राबविला — कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करण्याचा.
या उपक्रमांतर्गत कष्टकरी महिलांना सन्मान म्हणून दिवाळी फराळ, मिठाई, पणती, दिवे तसेच रोख रक्कम देण्यात आली. उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत, फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला मंथन फाउंडेशनच्या आशा भट्ट-वेलणकर आणि कायदेतज्ञ मनीषा महाजन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या समाजहिताच्या आणि निस्वार्थी कार्याची सविस्तर माहिती दिली.
सहसचिव मंगला डोळे-सपकाळे यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले, तर सचिव जयंत कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमात अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्षा सोनाली मन्हास, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, सल्लागार रवींद्र सागडे, खजिनदार दिलीप चक्रे, लायन्स क्लब अध्यक्ष रवींद्र काळे, क्रांती कुमार कडूलकर, रवींद्र साबळे, जयंत कुलकर्णी, सलीम सय्यद, धनंजय मांडके, उधळमकर, अनिल शिंदे, खुशाल दुसाने, दारासिंग मन्हास, अपर्णा कुलकर्णी, सदाशिव गुरव, अनिल पोरे, मधुकर वाडेकर, विलास घटने, श्रीराम दाते, क्रांती कुमार कडूलकर, दिलीप पेटकर, जयवंत राऊत, झाकीर सय्यद, आसावरी बच्चे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी हा उपक्रम निस्वार्थी सेवा म्हणून मनापासून यशस्वी केला. समाजसेवेचा संदेश देणारा हा दिवाळी उपक्रम उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
