विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा : पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा : पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
मुंबई – राज्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्याचा त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो, याची दखल घेत राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे की, पुरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांचे शिक्षण अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्काची माफी देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण पुरामुळे बाधित होऊ नये, याची दक्षता घेण्यात येणार आहे.
यासोबतच, शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत सरकारचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

