**वचनपूर्तीचा शब्द पाळला..!
आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रयत्नातून घोगरगाव ते गोलवड वस्ती पाणंद रस्त्यासह अनेक रस्त्यांना भरघोस निधी**
नेवासा, दि. १८ (प्रतिनिधी) –
नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करत तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर करून घेतला आहे.
विशेष म्हणजे, घोगरगाव येथील अग्नि माता मंदिर ते गोलवड वस्ती या पाणंद रस्त्याला इतिहासात प्रथमच भरघोस निधी मंजूर झाला असून, या रस्त्याच्या मंजुरीमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय, नेवासा तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांच्या उन्नतीसाठी आमदार लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
तालुक्यातील शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानत अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी : शाम शिरसाठ