Maharashtra
पुरग्रस्तांसाठी ब्राह्मण महासंघ तुळजापूर शाखेचा मदतीचा हात

पुरग्रस्तांसाठी ब्राह्मण महासंघ तुळजापूर शाखेचा मदतीचा हात
धाराशिव – ब्राह्मण महासंघ जिल्हा धाराशिव तुळजापूर शाखेच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती कुलकर्णी आणि त्यांच्या पदाधिकारी यांनी एकूण ३०० पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
या उपक्रमांतर्गत ब्लॅंकेट, चादरी, शाली, साड्या आणि शर्ट-पँट पिसेस अशा आवश्यक वस्तूंचे वाटप आज धाराशिव येथे करण्यात आले. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही मदत अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे स्थानिकांनी नमूद केले.
ब्राह्मण महासंघ तुळजापूर शाखा, जिल्हा धाराशिव यांच्या या सामाजिक कार्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे 💐🎊
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

