Maharashtra
मराठवाड्यातील पूरग्रस्तांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मदतीचा हात
मराठवाड्यातील पूरग्रस्तांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मदतीचा हात

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ४३ लाख ९५ हजार रुपयांचा धनादेश मदत स्वरूपात देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ४३ लाख ९५ हजारांचा धनादेश दिला आहे. पोलीस आयुक्त चौबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्द केला.
मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळला होता, या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यात शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं, जनावर मृत्युमुखी पडली, यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून बळीराजाला मदतीचा हात दिला जात आहे.
प्रतिनिधी:- विजय अडसूळ
