मराठी पाऊल पडते पुढे – अभिजीत दत्तात्रय शिंदे , सार्थक ढोकले आणि तुषार होरे यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण ,लोकार्पण सोहळा
मराठी पाऊल पडते पुढे – अभिजीत दत्तात्रय शिंदे , सार्थक ढोकले आणि तुषार होरे यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण ,लोकार्पण सोहळा
पुणे | प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन पाऊल उचलण्याच्या उद्देशाने उद्योजक आणि दिग्दर्शक अभिजीत शिंदे यांनी आपले पदार्पण केले आहे. त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या घोषणा नुकतीच करण्यात आल्या असून, हा चित्रपट सामाजिक संदेश, मनोरंजन आणि आधुनिक शैलीचा संगम असेल, असे शिंदे यांनी सांगितले.
अभिजीत शिंदे यांना चित्रपट क्षेत्रातील आव्हाने आणि संधी दोन्हीचं अनुभव असून, त्यांनी या प्रोजेक्टमध्ये स्थानिक कलावंतांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा दावा आहे की हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरताच मर्यादित न राहता सामाजिक संदेश पोहचवणारा ठरेल. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत स्थानिक तंत्रज्ञ, लेखन आणि संगीत क्षेत्रातील नावाजलेले कलाकार सहभागी होणार आहेत. अभिजीत शिंदे यांनी सांगितले की, “मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेण्याची इच्छा आहे. यासाठी आधुनिक दृष्टिकोनातून कथा मांडली आहे.”
याच पार्श्वभूमीवर, मराठी निर्माते सार्थक ढोकले आणि तुषार होरे यांच्या चित्रपट “वाट पहिल्या प्रेमाची” चा पोस्टर व गाणे लोकार्पण १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मिरज सिनेमा, स्पाइन सिटी मॉल, मोशी प्राधिकरण, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे, कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध उद्योजक श्री प्रकाश शेठ धारिवाल आणि श्री मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ उपस्थित राहणार आहेत, तसेच विशेष उपस्थित मान्यवरांमध्ये श्री महेश दादा लांडगे, भोसरी आमदार, आणि श्री विलास लांडे, माजी आमदार हवेली यांची उपस्थिती असणार आहे.
निर्माते सार्थक ढोकले आणि तुषार होरे यांनी सांगितले की, “हा चित्रपट प्रेम, भावना आणि सामाजिक संदेश यांचा संगम आहे. प्रेक्षकांना हा अनुभव भावेल आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन मापदंड ठरेल.” पोस्टर आणि गाण्याच्या लोकार्पणाने प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल पहिल्यांदा झलक पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे उत्सुकता आणि अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.
या सर्व उपक्रमांमधून स्पष्ट होते की “मराठी पाऊल पडते पुढे”, आणि मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दिग्दर्शक, निर्माते व कलाकारांचा विश्वास, तसेच स्थानिक कलांमध्ये प्रगती करण्याची संधी दिवसेंदिवस अधिक खुलत आहे.
श्री दत्तात्रय शिंदे सर यांनी आपण सर्वजण या लोकार्पण सोहळ्यास, मराठी उद्योजक, दिग्दर्शक निर्माते यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ