Maharashtra

महापूरग्रस्त विद्यार्थ्यासाठी ‘लोकसंघर्ष’ची माणुसकी; रु. ३१,००० भरून शिक्षणाला दिला आधार!

User Rating: 5 ( 1 votes)

महापूरग्रस्त विद्यार्थ्यासाठी ‘लोकसंघर्ष’ची माणुसकी; रु. ३१,००० भरून शिक्षणाला दिला आधार!

पुणे: (श्री महेंद्र बेराड सर प्रतिनिधी)मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत महापूर आणि अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे ८०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी लोकसंघर्ष पक्षाने ‘शिक्षण सुरु राहिलं पाहिजे’ या धोरणांतर्गत मदतीचा महत्त्वपूर्ण हात पुढे केला आहे.

पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यांची मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. याचाच भाग म्हणून, बीड जिल्ह्यातील वडवणी (वडवणी) तालुक्यातील पिंपळटक्का येथील महेश दत्तात्रय यादव या होतकरू विद्यार्थ्याला तत्काळ मदत करण्यात आली. महेश हा पुण्यातील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट मध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या वडिलांची केवळ दीड एकर शेती असून, अतिवृष्टीमुळे संपूर्ण १००% सोयाबीन पीक नष्ट झाले होते, ज्यामुळे त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कुटुंबाला अशक्य झाले होते.

पक्षाध्यक्ष ॲड. योगेश माकणे यांच्या हस्ते मदत
या परिस्थितीत, पक्षाचे वडवणी तालुका अध्यक्ष श्री. इंद्रमोहन त्रिंबक कदम यांनी तातडीने गरजू कुटुंब आणि विद्यार्थ्याला पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी जोडून दिले. यानंतर, पक्षाचे अध्यक्ष ॲड. योगेश माकणे यांनी स्वतः महेशच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याच्या फी मधील रु. ३१,०००/- (एकतीस हजार रुपये) भरले.

यावेळी ॲड. योगेश माकणे यांनी स्पष्ट केले की, “काहीही झाले तरी शिक्षण अर्धवट राहिले नाही पाहिजे. सर्व समाज शिक्षित झाला पाहिजे, हे पक्षाचे धोरण आहे. नैसर्गिक आपत्तीत संकटग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”

“हा पक्ष बोलून नाही, तर कृतितून उत्तर देतो!”
या मदतकार्याबद्दल बोलताना लोकसंघर्ष पक्षाचे वडवणी तालुका अध्यक्ष इंद्रमोहन त्रिंबक कदम यांनी आपला अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले, “मला अभिमान आहे की मी अशा पक्षामध्ये काम करतो. आम्हाला सत्ता भोगता येत नाही म्हणून वाईट वाटत नाही, कारण लोकसंघर्ष पक्ष आपत्कालीन परिस्थितीत, येथील नागरिकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. अनेक लोक पक्षाचे विचार मांडताना म्हणत होते की असे कितीतरी पक्ष झाले, त्यांनी आतापर्यंत काय केले? त्या लोकांना मी सांगू इच्छितो की आमचा पक्ष बोलून उत्तर देत नाही, तर कृतितून उत्तर देतो. आज त्यांना देखील याचे उत्तर मिळाले असेल.”

वडिलांनी मानले आभार: “मुलाला उज्वल भविष्य देण्याचे अतुल्य कार्य”
दरम्यान, विद्यार्थी महेशचे वडील दत्तात्रय मलमत यादव यांनी लोकसंघर्ष पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. योगेश माकणे आणि तालुका अध्यक्ष इंद्रमोहन त्रिंबक कदम यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “माझ्या मुलाला उज्वल भविष्य देण्याचे जे कार्य आपल्या माध्यमातून झाले, ते अतुल्य आहे. या मदतीमुळे माझ्या मुलाचे शिक्षण थांबले नाही.”

लोकसंघर्ष पक्षाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आणि त्वरित केलेल्या आर्थिक मदतीमुळे पूरग्रस्त भागातील महेशसारख्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मार्ग खुले झाले आहेत.

(सौजन्य: लोकसंघर्ष पक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button