हिंदू महासभेचा पदवीधर मेळावा ५ ऑक्टोबरला पुण्यात
हिंदू महासभेचा पदवीधर मेळावा ५ ऑक्टोबरला पुण्यात
पुणे – अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल, टिळक रोड, पुणे येथे पदवीधर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
“हिंदू पदवीधरांचे भवितव्य धोक्यात आहे का?” या विषयावर या मेळाव्यात चर्चा होणार असून जिल्हा, शहर, तालुका, गाव, मतदारसंघ व प्रभाग कार्यकारिण्यांचा विस्तार तसेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
मेळावा सकाळी ११ वाजता सुरू होणार असून हिंदू महासभेचे पदाधिकारी, पदवीधर व विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
📌 प्रमुख आयोजक व संपर्क:
आनंद दवे – प्रदेश कार्याध्यक्ष (मो. 9822176664)
मनोज तारे – सहकार्यवाह महाराष्ट्र
नितीन शुक्ल – प्रदेश पदाधिकारी
उमेश कुलकर्णी – प्रदेश पदाधिकारी
हिंदू महासभेत सक्रिय सहभाग घ्यायची इच्छा असलेल्या बंधू-भगिनींनी संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

