“हिंदू महासभा महाराष्ट्रात सज्ज — हिंदू हितासाठी नव्या उर्जेने कार्यरत”
*हिंदू महासभा महाराष्ट्रातही सज्ज हिंदूच्या हितासाठी लढण्यास अनेकांची मिळतेय पसंती.

दि ५ अॉक्टोबर २०२५ रोजी पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयजी कुलकर्णी व वैशमपायन काका उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात प्रास्ताविक मनोज तारे यांनी केले ,सौ आदिती जोशी यांनी केलेले मार्गदर्शनास सर्वांनी उत्तम प्रतिक्रीया दिली,महत्वाच्या टप्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षांनी हिंदू महासभेची कार्याबद्दलची दृढ निश्चयता व सततचा लढा याबाबत सर्वासमोर आढावा मांडला यापुढेही हिंदू हितासाठी महासभा कार्यकरीत राहील हे नमूद केले.कार्याध्यक्ष आनंदजी दवे यांनी उपस्थितांना सद्ध्या हिंदूना कसे घाबरवले जाते ,कशी दिशाभूल करण्यात येते अशा अनेक गोष्टी ज्या सद्ध्या घडत आहेत या बाबत सर्वांना मार्गदर्शन केले व यापुढे नवीन पिढीच्या भविष्यासाठीचा लढा मुख्य ध्येय असल्याचे सांगितले तसेच याकरिता येणार्या सर्व निवडणूकांमध्ये हिंदू महासभेचे उमदेवार लढतील असे सांगितले सुत्रसंचलन सौ विद्या घटवाई यांनी केले
*सदर कार्यक्रमात विस्तार कार्यानुसार प्रदेश,जिल्हा,शहर व आघाड्यांवर नवीन ३० पदाधिकारींच्या नियुक्ती करण्यात आल्या व लवकरच आजूनही नियुक्ती होणार आहेत*
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी