गंगोत्री पार्क भोसरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील स्वराज भुजबळ या विद्यार्थ्यांची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली

गंगोत्री पार्क भोसरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील स्वराज भुजबळ या विद्यार्थ्यांची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली
बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या ‘मिशन ऑलिंपिक ‘राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत स्वराज भुजबळ यांनी 41 किलो वजन गटात व 14 वर्ष वयोगटात सुवर्णपदक पटकावले आहे नोव्हेंबर महिन्यात 21 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या उझंबें किस्तान येथे होणाऱ्या आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी स्वराज भुजबळ याची निवड झाली आहे
या उज्वल यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे चे सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अजित भाऊ गव्हाणे यांनी कुस्तीपटू स्वराज भुजबळ, प्रशिक्षक प्रशांत बाबर ,विद्यालयाच्या क्रीडा विभाग प्रमुख प्रियंका बागल यांचे अभिनंदन केले
परिसरातील पालक शिक्षक विद्यार्थी यांच्याकडून सुवर्णपदक प्राप्त केलेल्या स्वराज भुजबळ या विद्यार्थ्या करिता अभिनंदनचा वर्षाव होत आहे प्रा. दत्तात्रय शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
