Maharashtra
भिडे पुलावरील वाहतूक सुरू
भिडे पुलावरील वाहतूक सुरू
पुणे: महा मेट्रो तर्फे डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी केबल ब्रीजचे काम सुरू असल्याने काही दिवसांपूर्वी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नागरिकांची वाढती गर्दी व मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुलावरील वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विश्रामबाग व डेक्कन वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी भिडे पुलावरील वाहतूक दिनांक 11 ऑक्टोबर 2025 पासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त यांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ

