वयोवृद्धांना बायोमेट्रिक प्रक्रियेत अडचणी; पर्यायी उपाययोजनांची मागणी
वयोवृद्धांना बायोमेट्रिक प्रक्रियेत अडचणी; पर्यायी उपाययोजनांची मागणी
पुणे :
आधार कार्ड,सरकारी योजना, बँकिंग व्यवहार आणि केवायसी प्रक्रियेसाठी अनिवार्य असलेली बायोमेट्रिक पडताळणी वयोवृद्धांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वयामुळे फिंगरप्रिंट्स स्पष्ट उमटत नाहीत, तसेच, मोतीबिंदू किंवा इतर डोळ्यांच्या समस्या मुळे स्कॅनमध्ये अडथळे येतात. त्यामुळे पेन्शन, बँक व्यवहार, तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वृद्धांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर प्रश्नावर तातडीने पर्यायी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिक व सामाजिक संस्थांकडून होत आहे. पावसाळी अधिवेशनात खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला दिसत नाही.
सध्या तरी बायोमेट्रिक पद्धतीमुळे स्कॅन न जुळल्यास व्यवहार अडकतो. त्यामुळे वृद्धांसाठी फेस रेकग्निशन, व्हिडिओ KYC, OTP आधारित पडताळणी किंवा अधिकृत ओळखपत्रावर आधारित पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर पर्यायी यंत्रणा उपलब्ध केली नाही, तर हजारो वयोवृद्ध नागरिकांना योजनांचा लाभ घेणे व बँकिंग व्यवहार करणे अधिक कठीण होणार असल्याचे सामाजिक संस्थांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429