“१० वर्षीय श्रावण गावडेचा मृत्यू; लहान वयात हार्ट अटॅकचा धोका वाढतोय”

कोल्हापूर;
कोल्हापूर येथे कोडोली गावात अवघ्या 10 वर्षाच्या श्रावण गावडे या चिमुकल्याचा खेळता खेळता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुले, तरुण व खेळाडू यांच्यात वाढणाऱ्या हृदयविकाराच्या घटनांबाबत गंभीर चर्चा सुरु झाली आहे.
काही खेळाडू सरावाच्या मैदानावर तर काही तरुण जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडत आहेत. इतक्या लहान वयात मृत्यू होत असल्याने समाजात चिंता वाढली आहे.
दरम्यान, SMA (Spinal Muscular Atrophy) सारख्या दुर्मिळ आजारांवर उपचारासाठी तब्बल ९ ते १० कोटी रुपये खर्च येतो. सर्वसामान्य कुटुंबांना एवढा खर्च परवडत नसल्याने अनेक मुलांचे प्राण वाचवता येत नाहीत.
“सरकारने मोठमोठ्या आजारांवरील उपचाराचा खर्च कसा कमी होईल यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. न मागता लाडकी बहीण ,ST तिकीट सारख्या फुकट सुविधा देण्यापेक्षा आणि महिला वर्गाला रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करावी. तसेच आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त पैसा गुंतवून हार्ट अटॅक, एसएमए सारख्या रोगांवर संशोधन करावे आणि कमी खर्चात औषध उपलब्ध करून द्यावे.”
आता तरी सरकारने निधीचा मोठा भाग संशोधन, आधुनिक उपचार व आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी वापरला नाही तर येत्या काळात अशा धक्कादायक घटनांची मालिका वाढतच जाईल.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
