Maharashtra

*शिव मोटर्स होंडा बाईक शोरूमचे पिंपळगाव रेणुकाई येथे भव्य उद्घाटन**

*शिव मोटर्स होंडा बाईक शोरूमचे पिंपळगाव रेणुकाई येथे भव्य उद्घाटन**

पारध शाहूराजे (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी) दिनांक 26/09/2025 :
पारध शाहूराजे येथील बारी समाजातील नामांकित युवा उद्योजक श्री राजेश भाऊ बारी यांच्या पिंपळगाव रेणुकाई येथील शिव मोटर्स –होंडा बाईक या नवीन टू व्हीलर शोरूमचा भव्य उद्घाटन उत्साहात पार पडला. या शो-रूममुळे परिसरातील तरुणाईला आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानयुक्त टू व्हीलर वाहनांची सहज उपलब्धता होणार असून, शेतकरी, कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेंद्रजी देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष श्री मनीषभैया श्रीवास्तव, श्री परमेश्वर पाटील लोखंडे, श्री दिलीप बेराड,श्री हरिभाऊ बेराड, श्री भगवानराव बोडखे, श्री किरण बारी तसेच पारध गावातील श्री अभिजीत बेराड, महेंद्र बेराड, गणेश तेलंग्रे,पिंपळगाव रेणुकाई परिसरातील स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते,व्यापारीवर्ग,पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फित कापून व पूजा-अर्चा करून शोरूमचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना राजेश भाऊ बारी म्हणाले की, “शिव मोटर्स या शोरूमद्वारे आम्ही ग्राहकांना उत्तम सेवा, सुलभ वित्तीय सुविधा आणि उत्कृष्ट विक्रीपश्चात सेवा देण्याचा प्रयत्न करू. ग्रामीण भागातील तरुणाईला, शेतकऱ्यांना अत्याधुनिक व पर्यावरणपूरक गाड्या सहज मिळाव्यात, हा आमचा मुख्य हेतू आहे.”

शो-रूममध्ये होंडा कंपनीचे सर्व नवीन मॉडेल्स,आकर्षक ऑफर्स, फायनान्स सुविधा तसेच तत्काळ डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना मिळावी म्हणून स्थानिक युवकांना येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.

पिंपळगाव रेणुकाई व आसपासच्या पंचक्रोशीतील लोकांसाठी हे शोरूम एक नवे पाऊल ठरणार असून, यामुळे ग्राहकांना जवळच्या ठिकाणीच उत्कृष्ट सुविधा मिळणार आहेत. उद्घाटन सोहळा आनंदी, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button