पुण्यात ग्लोब-टेक इंजिनिअरिंग एक्स्पो २०२५ उत्साहात सुरु
पुण्यात ग्लोब-टेक इंजिनिअरिंग एक्स्पो २०२५ उत्साहात सुरु

पुणे, १२ सप्टेंबर २०२५ – पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, मोशी येथे आजपासून १०व्या ग्लोब-टेक इंजिनिअरिंग एक्स्पोला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या भव्य प्रदर्शनात देशभरातील प्रमुख औद्योगिक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित ब्रँड यांच्या सहभागाने विविध अभियांत्रिकी उत्पादने, नवनवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रदर्शित केली जात आहेत.
या एक्स्पोमध्ये कॅड-कॅम, ऑटोमेशन, कास्टिंग, फोर्जिंग, लेझर तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स अशा विविध क्षेत्रांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. विविध कंपन्यांच्या सहभागामुळे उद्योजकांसाठी व तंत्रज्ञानप्रेमींसाठी ही एक संधी ठरणार आहे. स्वागत प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट आणि गियर-थीम असलेली डिझाइन, तसेच विविध नामांकित कंपन्यांचे लोगो या एक्स्पोचे वैशिष्ट्य ठरले आहे.
ग्लोब-टेक आयोजित या अभियांत्रिकी प्रदर्शनात उद्योगसमूह, व्यवसायिकसाठी मुक्त प्रवेश आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
