पीसीएमसी महापालिकेकडून थेरगाव येथील केजुबाई देवी घाटावर गणेश विसर्जनाची उत्कृष्ट सोय
📰 पीसीएमसी महापालिकेकडून थेरगाव येथील केजुबाई देवी घाटावर गणेश विसर्जनाची उत्कृष्ट सोय

पिंपरी चिंचवड :
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने केजुबाई देवी घाटावर भाविकांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
🔸 विसर्जनासाठी दोन स्वतंत्र हौदांची व्यवस्था करून गर्दी नियोजनबद्धपणे हाताळली जात आहे.
🔸 गणपती आरतीसाठी स्वतंत्र टेबलची सोय करण्यात आली आहे.
🔸 फुले, फळे व निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र सोय करून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जनाचा मार्ग अवलंबला आहे.
🔸 वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात करून वाहतूक नियंत्रणाची विशेष काळजी घेतली जात आहे.
🔸 तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक गणपतीची महापालिकेच्या रजिस्टरमध्ये नोंद केली जात असून, यामुळे आकडेवारी स्पष्ट व पारदर्शक राहणार आहे.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे भक्तांमध्ये समाधानाची भावना असून, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, शिस्तबद्ध वाहतूक व पारदर्शक व्यवस्थापनाचा आदर्श संदेश यातून दिला जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
