मोठ्या गणपती मूर्तींच्या विसर्जनात विटंबना – भाविकांचा संताप
मोठ्या गणपती मूर्तींच्या विसर्जनात विटंबना – भाविकांचा संताप
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाच्या वेळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. भक्तिभावाने आणलेल्या मोठ्या मूर्ती जेसीबी व इतर यंत्रांच्या सहाय्याने समुद्रात उतरवताना आडव्यात टाकल्या जात असल्याचे अनेकांनी पाहिले. काही ठिकाणी तर मूर्तीला चक्क ढकलून दिल्याचेही दृश्य उघड झाले.
भक्तगणांनी भावपूर्ण श्रद्धेने घरातून व मिरवणुकीतून आणलेल्या या गणरायाच्या मूर्तींचा असा अपमान होताना पाहून अनेकांचे मन विचलित झाले.
👉 प्रश्न उपस्थित होत आहे की –
जर एवढ्या मोठ्या मूर्तींचे व्यवस्थित व सन्मानपूर्वक विसर्जन करता येत नसेल, तर अशा मूर्ती घेण्याची गरज तरी काय?
प्रशासनाने वेळीच योग्य उपाययोजना करून मूर्तीची विटंबना थांबवली पाहिजे.भक्तिभावाने उभारलेले हे स्वरूप शेवटच्या क्षणी विटंबनासारख्या अवस्थेत जावे, हे भाविकांना मान्य नाही. प्रशासन आणि गणेश मंडळांनी मिळून यावर ठोस उपाय काढणे ही काळाची गरज आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
