Uncategorized

लोकअदालतीत वाहतूक दंड सवलतीत भरण्याची सुवर्णसंधी

📰 लोकअदालतीत वाहतूक दंड सवलतीत भरण्याची सुवर्णसंधी

हेल्मेट न लावणे, सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट वाहन चालविणे अशा किरकोळ वाहतूक नियमभंगांवरचे प्रलंबित दंड आता सवलतीत भरता येणार आहेत. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीत १० ते १३ सप्टेंबर या काळात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

📍 ठिकाण: येरवडा पोस्ट ऑफिसशेजारी वाहतूक शाखा कार्यालय
⏰ वेळ: सकाळी १० ते सायं. ५

✅ सवलतीत भरता येणारे दंड

विनाहेल्मेट दुचाकी चालविणे

सीटबेल्ट न लावणे

सिग्नल तोडणे

वेगमर्यादा ओलांडणे

चुकीचे पार्किंग

वाहन चालवताना मोबाइल वापरणे

विनापरवाना/विना पीयूसी वाहन चालविणे

फिटनेस प्रमाणपत्र नसणे

चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे

नंबरप्लेट नसणे

❌ सवलत न मिळणारे गंभीर गुन्हे

मद्यपान करून वाहन चालविणे

अपघात करून पळ काढणे

निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघात घडविणे

अल्पवयीनाकडून वाहन चालवून घेणे

अनधिकृत शर्यती

गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर

न्यायालयीन सुनावणीतील प्रकरणे

अन्य राज्यातील वाहतूक चलने

🗣️ प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. महेंद्र महाजन म्हणाले –
“राष्ट्रीय लोकअदालतीमुळे नागरिकांना सवलतीत दंड भरून कायदेशीर मार्गाने थकबाकीमुक्त होता येईल. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.”

🗣️ सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. सोनल पाटील म्हणाल्या –
“या उपक्रमातून प्रलंबित चलने निकाली निघतीलच, शिवाय वाहतूक शिस्तीबाबत जनजागृतीही होईल.”

🗣️ मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एस. बी. पाटील,
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, तसेच वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button