इलेक्ट्रिक रिक्षावरून आयुक्तांचा ‘ग्रीन’ प्रवास! पिंपरी चिंचवड महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम.
इलेक्ट्रिक रिक्षावरून आयुक्तांचा ‘ग्रीन’ प्रवास!
पिंपरी चिंचवड महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम.
पिंपरी चिंचवड | २५ सप्टेंबर २०२५
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आवारात आज एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम साकारण्यात आला. पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या ऑटो रिक्षाला इलेक्ट्रिक रिक्षामध्ये रूपांतर करण्यात आले असून, या नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांनी स्वतः इलेक्ट्रिक रिक्षातून छोटी सफर केली.
या उपक्रमाचा उद्देश हरित वाहतुकीला प्रोत्साहन देणे, कार्बन उत्सर्जनात घट करणे आणि शाश्वत शहर विकासाच्या दिशेने पाऊल टाकणे असा आहे. आयुक्तांनी रिक्षाचा प्रत्यक्ष अनुभव घेत नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पर्यावरणासाठी अशा पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
“शाश्वत आणि हरित शहर घडवण्यासाठी अशा नवकल्पनांची गरज आहे. ही रिक्षा केवळ इंधन बचत करत नाही, तर पर्यावरणालाही मोठा दिलासा देते,” असे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
प्रतिनिधी – शाम शिरसाठ पुणे.