दिलीप प्रभावळकरांची कमाल – ‘दशावतार’ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर धडाकेबाज कमाई

दिलीप प्रभावळकरांची कमाल – ‘दशावतार’ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर धडाकेबाज कमाई
मराठी सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणू शकत नाही, हे मत आता धुळीस मिळालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणलं असून बॉलीवूडलाही टक्कर दिली आहे.
‘दशावतार’ चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल २.०२ कोटींची कमाई केली आहे. रविवारीदेखील चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून दुपारपर्यंतच या चित्रपटाने ३ कोटींचा पल्ला पार केला आहे. मराठी चित्रपट सहसा मराठी प्रेक्षकांपुरते मर्यादित राहतात, त्या तुलनेत ही कमाई नक्कीच अभिमानास्पद आहे.
या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी मुख्य भूमिका साकारली असून भूमिकेसाठी काही स्टंटदेखील केले आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सुनील तावडे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, रवी काळे, विजय केंकरे आणि आरती वाडगबाळकर यांनीही उत्कृष्ट अभिनय सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

