अजित पवारांचा मोठा निर्णय: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी

अजित पवारांचा मोठा निर्णय: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी
पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी एक महत्त्वाचा आणि मानवतेची जाणीव दाखवणारा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि आर्थिक धक्का बसेल अशा शेकडो कुटुंबांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व मंत्री, आमदार आणि खासदार आपल्या एक महिन्याच्या पगाराचा निधी पूरग्रस्तांना देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, शेकडो शेतकरी आणि गावकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या निर्णयाला अनेकांनी कौतुक केले आहे, कारण या मदतीच्या रकमेमुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळेल तसेच पुनर्वसन प्रक्रियेस गती मिळेल.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “ही फक्त सुरुवात आहे, पुढील काळातही आम्ही या अपत्तीग्रस्त स्वरूपासाठी आणि पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत कार्ये करत राहू.”राज्यातील पूरग्रस्तांवर लक्ष ठेवून या मदत उपक्रमामुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यात मोठी मदत होणार असून, या कृतीमुळे राज्याचे सामाजिक बांधिलकीचे भान अधोरेखित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


