Maharashtra

फलटण एज्युकेशन सोसायटीतर्फे महेंद्र बेराड यांची जालना जिल्हा शैक्षणिक सल्लागारपदी नियुक्ती*

User Rating: 3.7 ( 1 votes)

*फलटण एज्युकेशन सोसायटीतर्फे महेंद्र बेराड यांची जालना जिल्हा शैक्षणिक सल्लागारपदी नियुक्ती*

फलटण (प्रतिनिधी), दिनांक २३ सप्टेंबर २०२५ :
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत मालोजीराजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रवेश केंद्र तसेच द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी, फलटण (जि. सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात श्री महेंद्र संपत बेराड यांना जालना जिल्हा शैक्षणिक सल्लागारपदी नियुक्ती देण्यात आली आणि त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.

या केंद्रामार्फत NDA, NEET, MHT-CET, JEE, NATA तसेच ११ वी-१२ वी सायन्स फाऊंडेशनसाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी प्रगत लायब्ररी, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन, अनुभवी शिक्षकवर्ग तसेच ऑनलाईन-ऑफलाईन टेस्ट सीरिजच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील होतकरू विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांत यश संपादन करण्यासाठी सर्वांगीण मदत मिळत आहे.

कार्यक्रमास मा. प्रा. अविनाश नरुटे सर (Director), प्रा. गणेश कोकरे सर (Branch Manager), प्रा. जमीर मुल्ला सर (Director, Bodhitree IAS NDA Academy, कोल्हापूर), सौ. अपर्णा शिंदे मॅडम (Admin Head), डॉ. महेश पतंगे सर (Academic Head cum Principal), श्री. सागर सूर्यवंशी सर (Educational Counselor Head), श्री. अभिजीत बनसोडे सर (Digital Marketing), श्री. निरंजन गुरव सर (Exam Head) तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

मान्यवरांनी बेराड सरांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना व्यक्त करताना, महेंद्र बेराड सरांच्या मार्गदर्शनामुळे जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांत अधिक यश मिळून जिल्ह्याचे व राज्याचे नाव देश पातळीवर उज्ज्वल होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.त्यांच्या या नियुक्तीबद्दल पारध परिसरातून तसेच संपूर्ण जालना जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button