Maharashtra

थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त जेजुरी येथे भव्य व्याख्यानमाला; इतिहासकार जगन्नाथ लडकत यांचे उत्साहपूर्ण मार्गदर्शन

थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त जेजुरी येथे भव्य व्याख्यानमाला; इतिहासकार जगन्नाथ लडकत यांचे उत्साहपूर्ण मार्गदर्शन

जेजुरी (ता. पुरंदर) –
मराठा साम्राज्याचे अजरामर सेनानायक थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त जेजुरी येथे एक प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध इतिहासकार जगन्नाथ लडकत यांनी अत्यंत उत्साहपूर्ण व अभ्यासपूर्ण व्याख्यानातून बाजीराव पेशव्यांच्या शौर्यगाथा, नेतृत्वगुण आणि ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला. श्रोत्यांनी त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, स्वानंद अत्रे मित्रपरिवार, तसेच पुण्य लोक अहिल्याबाई होळकर हायस्कूल, जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमास प्रखर हिंदुत्ववादी नेते मिलिंदजी एकबोटे आणि माजी आमदार अशोक टेकवडे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी देखील आपल्या भाषणातून आजच्या तरुण पिढीने बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वगुणांचा आणि विचारांचा आदर्श घ्यावा, असे  सांगितले.

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून ब्राह्मण महासभेचे पदाधिकारी —
मयुरेशजी आरगडे, चैतन्यजी जोशी, विद्याताई घटवाई आणि रूपालीताई जोशी यांचीही उपस्थिती लाभली. त्यांनीही आपल्या उपस्थितीतून कार्यक्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमास आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी इतिहासाची प्रेरणा देणाऱ्या या व्याख्यानातून राष्ट्रभक्ती आणि अभिमान जागवणारा अनुभव घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये ऐतिहासिक जाणीव निर्माण होते आणि समाजप्रबोधनाची वाट मोकळी होते, असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button