राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन ‘बेमुदत आंदोलन’ सुरू
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन ‘बेमुदत आंदोलन’ सुरू

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ यांच्या वतीने राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ पासून ‘बेमुदत आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालय येथे आयोजित केले गेले.
या आंदोलना अंतर्गत मागण्या:
नियमित शासकीय सेवेत समावेश व स्थायी धोरणांची अंमलबजावणी
वेतनवाढ, आरोग्य व अपघात विमा तसेच अन्य सुविधांची पूर्तता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात
आंदोलनाच्या ठरावानुसार, शासनाने दिनांक १४ मार्च २०२४ रोजी संबंधित अधिकाऱ्य व कर्मचार्यांसाठी घेतलेल्या निर्णयानुसार उपेक्षा केल्याचे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. हे बेमुदत आंदोलन शासकीय स्तरावर दखल घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत राज्यभरातील सर्व अधिकारी व कर्मचारी चालू ठेवतील.
या आंदोलनामुळे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढील कार्यवाहीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429