Maharashtra
गौरी आगमनाने घराघरांत भक्तिभावाचे वातावरण 🌸

🌸 गौरी आगमनाने घराघरांत भक्तिभावाचे वातावरण 🌸
पुणे :
गणेश आगमनानंतर आता गौरी आगमनाचा उत्साह पुणे शहरासह जिल्ह्यात घराघरांत पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच महिलावर्गाने रांगोळ्या काढून, फुलांची सजावट करून आणि मंगलगीतांच्या स्वरांत देवी गौरीचे स्वागत केले.
या आगमनानिमित्त बाजारपेठेत फळं, फुलं, भाजीपाला व सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी दिसून आली. पुणे मंडई, शनिवार पेठ, लक्ष्मी रोड परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली.
गौरीपूजनासाठी पारंपरिक पद्धतीने भाजी-भाकरीचा नैवेद्य तसेच विविध गोडधोड फराळ पदार्थ तयार करण्यात येत आहेत. या नैवेद्यामुळे सणासुदीचा स्वाद घराघरांत दरवळत आहे.
गौरी आगमनामुळे भक्तिभाव, आनंद आणि सौभाग्याचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी घराघरांत जल्लोष साजरा केला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

