Maharashtra
गणेशोत्सवानिमित्त मंडई मेट्रो स्टेशनवर बदल; उतरण्यास बंद, चढणाऱ्यांना परवानगी
गणेशोत्सवानिमित्त मंडई मेट्रो स्टेशनवर बदल; उतरण्यास बंद, चढणाऱ्यांना परवानगी
पुणे :
गणपती दर्शनासाठी मंडई परिसरात वाढलेल्या प्रचंड गर्दीमुळे मंडई मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, येथून प्रवासी चढू शकतील, अशी माहिती मिळाली आहे.
गर्दीचे नियंत्रण राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांनी पर्यायी थांबे म्हणून कसबापेठ किंवा स्वारगेट मेट्रो स्टेशनचा वापर करावा, असे सांगितले गेले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर मंडई स्टेशनवर उतरण्याची सुविधा पुन्हा सुरू होणार आहे.
✍️ प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे
📞 9822548429
