*”गणेशोत्सव – सामाजिक ऐक्य, श्रद्धा व संस्कृतीचा महापर्व”*
📰 गणेशोत्सव – सामाजिक ऐक्य, श्रद्धा व संस्कृती
्
पिंपरी चिंचवड |
आजपासून श्री गणेशाची भव्य व मंगलमय प्रतिष्ठापना होत असून महाराष्ट्रात आनंद, भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृती आणि सामूहिक चेतनेशी जोडलेला हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि लोकशक्तीचे प्रतीक ठरतो.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करून जनतेत राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागवली. त्या परंपरेतून आजही गणेशोत्सव समाजकार्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचे माध्यम ठरत आहे.
गणेशोत्सव हा फक्त पूजा-अर्चेपुरता मर्यादित नसून तो समाजातील भेदभाव विसरून एकत्र येण्याचा आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा संदेश देतो. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करून पुढील पिढ्यांसाठी निसर्ग संवर्धन करण्याचे महत्त्व या पर्वात अधोरेखित होते.
सध्याच्या काळात बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक असमानता यांसारख्या समस्यांमध्ये गणेशोत्सव हा भक्तिभाव, आनंद, बंधुता आणि ऐक्याचा संदेश देत समाजाला एकत्र आणतो.
या मंगलमय पर्वात समाजातील एकोपा जपत जबाबदाऱ्या पार पाडण्याचा संकल्प सर्वत्र केला जात आहे. श्री गणेशाचे “वक्रतुंड महाकाय” हे स्तोत्र संकटनिवारणाची प्रेरणा देत राहो, अशी भाविकांची प्रार्थना आहे.
✨ गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
प्रतिनिधी शाम शिरसाठ पुणे



