चिंचवड,केशवनगर गणेश विसर्जन घाटावर आरतीसाठी चौथऱ्यांची मागणी
चिंचवड ,केशवनगर गणेश विसर्जन घाटावर आरतीसाठी चौथऱ्यांची मागणी

गौरी-गणपती आगमनाची वेळ समीप आली असून गणेश विसर्जन घाटावर भाविकांची मोठी गर्दी होत असते. अनेक गणपती दीड दिवसानंतर विसर्जनास येतात व त्यानंतर गौरी व अन्य गणपतींचे विसर्जन होते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महावितरण समितीचे सदस्य श्री. मधुकर बच्चे यांनी विसर्जन घाटाची पाहणी केली असता लक्षात आले की, गेल्या वर्षी आरतीसाठी योग्य चौथऱ्याची उभारणी झाली नव्हती. त्यामुळे अनेक गणेश भक्तांना रस्त्यावर उभे राहून किंवा कठड्याला आधार घेऊन आरती करावी लागली होती व त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
यावर्षीदेखील विसर्जन घाटावर दोन चौथरे बांधलेले असले तरी ते उत्तर-दक्षिण दिशेत असून गणेश भक्त परंपरेनुसार पूर्व-पश्चिम दिशेला आरती करण्याची प्रथा आहे. याकडे मागील वर्षीच अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले होते; मात्र योग्य समाधान झालेले नाही.
त्या अनुषंगाने मागणी व आवाहन असे की :
विसर्जन घाटावर किमान तीन चौथरे योग्य दिशेत (पूर्व-पश्चिम) लवकरात लवकर उभारण्यात यावेत.
पर्यायी स्वरूपात पाच मजबूत टेबलांची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी.
गणेश भक्तांच्या श्रद्धा-भावनेचा मान राखून सुविधांची खात्री करून द्यावी.
भाविकांच्या भावनांशी खेळ होणार नाही याची दक्षता घ्यावी,
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे