अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाशी झुंज देत ३८ व्या वर्षी निधन
अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाशी झुंज देत ३८ व्या वर्षी निधन
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: ३१ ऑगस्ट २०२५ – मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे आज पहाटे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रिया मराठे यांनी मराठी तसेच हिंदी मालिकांमधून आपली स्वतंत्र छाप उमटवली होती. ‘या सुखांनो या’, ‘तू तिथे मी’, ‘कॉमेडी सर्कस’ यांसह हिंदी मालिकांमध्ये ‘पवित्र रिश्ता’तील वरषा ही त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण झालं.
२४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेत्रीने अभिनेता शांतनू मोघे यांच्याशी विवाह केला. प्रिया यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मनोरंजन विश्वातील सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी सामाजिक माध्यमांवरून प्रिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे