Uncategorized
आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती; पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन.
📰 पिंपरी-चिंचवड महापालिकेत गणेशोत्सव उत्साहात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित या उत्सवात आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली.
या वेळी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि अनेक नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सव हा समाजातील एकात्मतेचा आणि संस्कृतीशी जोडणारा सण असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
महापालिकेच्या विविध विभागांतर्फे गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत असून, धार्मिक वातावरणात उत्सवाला सुरुवात झाली आहे.
🙏✨ गणपती बाप्पा मोरया!
प्रतिनिधी:शाम शिरसाठ पुणे .