विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावहिनी सिंहगड भाग नांदेड प्रखंड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर
विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल मातृशक्ती दुर्गावहिनी सिंहगड भाग नांदेड प्रखंड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर
पुणे: विश्व हिंदू परिषद (विहिंप) बजरंग दल मातृशक्ती दुर्गावहिनी, सिंहगड भाग नांदेड प्रखंड व भारती आयुर्वेद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत जुने दत्तमंदिर कोल्हेवाडी येथे होणार आहे.
या आरोग्य शिबिरात विविध तपासण्या करण्यात येणार असून त्यात नेत्ररोग, कान, नाक, घसा, दात आणि त्वचा विकारांशी संबंधित तपासण्यांचा समावेश आहे. तसेच, रक्तगट तपासणी, एच.बी. तपासणी आणि रक्तदान या सुविधाही उपलब्ध असतील. शिबिरात पंचकर्म उपचार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा पुरवली जाईल. सर्व रोगांचे निदान आणि तपासणी देखील केली जाईल.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शनही मिळणार आहे. “संपत्तीचा बँक बॅलन्स महत्त्वाचा नाही, तर आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असेल तर आयुष्याला अर्थ आहे,” या संदेशासह नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे