Uncategorized
शनिशिंगणापूर देवस्थानने मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; मोर्चाआधीच घेतला मोठा निर्णय.
Shani Shingnapur News: शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने मोठी कारवाई केली आहे. हिंदू संघटनांच्या मागणीनंतर ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांसहित एकूण १६७ जणांना कामावरून कमी केले. अनियमितता आणि शिस्त न पाळल्याने ही कारवाई झाली. या कर्मचाऱ्यांमध्ये कृषी, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील लोकांचा समावेश आहे. काही कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कामावर येत नसल्याचे ट्रस्टने सांगितले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आ हे.
हिंदूंच्या देवस्थानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम कर्मचारी नोकरीला कसे? असा आक्षेप घेत सकल हिंदू समाजातर्फे १४ जून रोजी शनिशिंगणापूर येथे मोर्चा काढण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. त्यापूर्वीच ट्रस्टने ही कारवाई केली आहे. हिंदू संघटनांच्या आक्षेपावर ट्रस्टचे म्हणणे असे की, देवस्थानच्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये ११४ मुस्लिम होते. मात्र, त्यातील कोणीही थेट मंदिरात नियुक्तीला नव्हते. हे कर्मचारी मंदिर ट्रस्टच्या कृषी विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षण विभागात काम करीत. यातील ९९ कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कामावर येत नव्हते. त्यांचा पगारही थकलेला आहे, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.
मे महिन्यापासून हा मुद्दा पेटला होता. शनिशिंगणापूरमधील शनीचौथऱ्याचे रंगरंगोटीचे काम करणाऱ्या काही मुस्लिम कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. हिंदूंच्या मंदिरात मुस्लिम कर्मचारी कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महाराष्ट्र मंदिर महासंघाने यावर आक्रमक भूमिका घेत त्या कर्मचाऱ्यांना हटविण्याची मागणी केली. त्यानंतर सकल हिंदू समाजातर्फे १४ जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, नगरचे आमदार संग्राम जगताप हेही यामध्ये सहभागी होणार आहेत. त्याआधीच देवस्थान ट्रस्ट च्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. मात्र त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना शिस्तभंगाचे कारण देण्यात आले आहे. ११४ पैकी ९९ कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून कामावरच येत नसल्याचे सांगण्यात आले. या ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांसोबत अन्य कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आह