राष्ट्रीय हॉकीपटू रमाकांत श्रीधर कारले यांची सहाय्यक पोलीस फौजदार पदावर पदोन्नती – विभागात आनंदाचे वातावरण

राष्ट्रीय हॉकीपटू रमाकांत श्रीधर कारले यांची सहाय्यक पोलीस फौजदार पदावर पदोन्नती – विभागात आनंदाचे वातावरण
पुणे (खडकी) :
खडकी येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले आणि राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू असलेले रमाकांत श्रीधर कारले यांची नुकतीच सहाय्यक पोलीस फौजदार (Assistant Police Sub-Inspector) या पदावर पदोन्नती करण्यात आली. हा क्षण त्यांच्यासाठी तसेच संपूर्ण विभागासाठी गौरवाचा व अभिमानाचा ठरला आहे.
या विशेष प्रसंगी आरपीआय श्री टोणे सर व आरएसआय श्री विजय भोसलें तसेच रिटायर्ड आरपीआय श्री. आनंद काजोलकर आणि राष्ट्रीय खेळाडू प्रकाश सपकाळ यांच्या हस्ते रमाकांत कारले यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांनी देखील त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
रमाकांत श्रीधर कारले यांनी आपल्या सेवाकाळात कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कार्यक्षमता यामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा राष्ट्रीय हॉकी खेळातील अनुभव व योगदान हे देखील त्यांच्या कर्तृत्वात भर घालणारे ठरले आहे.
ही पदोन्नती केवळ त्यांच्या कार्यक्षमतेची पावती नसून, पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
प्रतिनिधी; उमेश कुलकर्णी पुणे,9822548429