रागोश्री कुलकर्णी यांना ‘सुजनसाधक पुरस्कार २०२५’; गायन मैफिलीचा विशेष कार्यक्रम २२ जूनला पुण्यात

📰 रागोश्री कुलकर्णी यांना ‘सुजनसाधक पुरस्कार २०२५’; गायन मैफिलीचा विशेष कार्यक्रम २२ जूनला पुण्यात
पुणे (प्रतिनिधी) :
युवा कलाकारांच्या गुणवत्तारूपी अमरस रसाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताला समर्पित ‘सुजनसभा’ या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन आणि पहिला सुजनसाधक पुरस्कार २०२५ वितरण सोहळा रविवार, २२ जून २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता पुण्यातील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सौ. रागोश्री वैरागकर कुलकर्णी यांना डॉ. प्रभा अत्रे यांच्या स्मृतिपुष्पांनंतर सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या संगीतमय योगदानाबद्दल ‘सुजनसभा’ तर्फे ‘सुजनसाधक पुरस्कार’ प्रदान करून गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रमानंतर रागोश्री कुलकर्णी यांची खास गायन मैफिल रसिकांसाठी सादर होणार आहे. कार्यक्रमास पं. रघुनंदनजी पणशीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून होनराज हेमंतराजे मावळे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक अक्षदा इनामदार असून प्रवेश सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. सायं. ५.३० ते ७.१५ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये सौ आदिती जोशी व श्री प्रांजल अक्कलकोटकर यांनी दिली
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 +91 9284640339 / 7249282683
📍 ठिकाण – पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे – ५
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे