पंढरपूर पायी वारीसाठी मोफत औषध सेवा

पंढरपूर पायी वारीसाठी मोफत औषध सेवा
दिनांक 18 जून 2025 पंढरपूर आषाढी वारीतील पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विश्व हिंदू परिषद अनेक वर्षांपासून डॉक्टर, नर्स, ऍम्ब्युलन्स आणि स्वयंसेवकांच्या सहाय्याने मोफत औषध सेवा देत आहे.
या उपक्रमात ‘मधुकर बच्चे युवा मंच’, ‘चैतन्य फार्मा ग्रुप’ व ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ यांच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात औषधं संकलित करून ती सेवा पुरवली जाते. यंदाही मोठ्या प्रमाणात औषधे जमा करून ती विश्व हिंदू परिषदेच्या ताब्यात देण्यात आली.
ही औषधे सुपूर्त करण्याचा कार्यक्रम चिंचवड, केशवनगर येथील ‘यशस्वी क्लासेस हॉल’ येथे पार पडला. कार्यक्रमाला भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, रा.स्व. संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, भाजपा प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा शहर उपाध्यक्ष रवी देशपांडे, नंदू भोगले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मधुकर बच्चे (महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य, भाजपा शहर सचिव व वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष) यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमात अजय दर्डा (कुंदन एजन्सी), मोहन कुलकर्णी, उद्योजक शंकर गावडे, वर्षा डांगे, मंगला डोळे-सपकाळे (यशस्वी क्लासेस), मारुती हाके (मोरया फार्मा), राजू कोरे, समाजसेवक रवींद्र सागडे, निलेश घाडगे, सागर जोशी, रम्या मास्ते यांनी मोलाची साथ दिली.
चैतन्य फार्मा ग्रुप तर्फे पोपट बच्चे, गणेश बच्चे, अक्षय गारगोटे, रोहिणी बच्चे, अर्चना बच्चे, काजल गावडे-बच्चे, श्रावणी बच्चे,आसावरी बच्चे यांनी सहभाग घेतला.
वुई टुगेदर फाउंडेशन तर्फे उपाध्यक्षा सोनाली मन्हास, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सलीम सय्यद, कडुलकर, धनंजय मांडके, दिलीप पेटकर दारासिंह मन्हास, गिरीष हंपे, मच्छिंद्र थोरवे, खुशाल दुसाने, आर्जुन पाटोळे यांचीही उपस्थिती होती.
औषधे स्वीकारण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे गोविंद देशपांडे, यशवंत देशपांडे, विजय देशपांडे, डॉ. शर्वरी एलगट्टिवार, पांडुरंग पुजारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन मंगला डोळे-सपकाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयंत कुलकर्णी यांनी केले.
विश्व हिंदू परिषद तर्फे मधुकर बच्चे व त्यांच्या सहकाऱ्यांचे, तसेच दानशूर देणगीदारांचे विशेष कौतुक करण्यात आले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे