नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून शिक्षक वडिलांकडून मुलीला मारहाण – अखेर मृत्यू
📰 नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून शिक्षक वडिलांकडून मुलीला मारहाण – अखेर मृत्यू
नेलकरंजी (ता. आटपाडी) | दिनांक – २३ जून २०२५
शैक्षणिक क्षेत्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. नीट परीक्षेतील चाचणीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून शिक्षक वडिलांनी आपल्या १७ वर्षीय मुलीला लाकडी खुंटीने अमानुष मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या संतापजनक घटनेने नेलकरंजी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव साधना धोंडीराम भोसले असून, ती इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले हे स्थानिक हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नीट परीक्षेतील चाचणीत मिळालेल्या कमी गुणांवरून रागाच्या भरात वडिलांनी जात्यावरची लाकडी खुंटी ने मारहाण केली या मारहाणीत ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. तिला तत्काळ आटपाडी व नंतर सांगली येथील रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
🛑 समाजासाठी आणि पालकांसाठी एक गंभीर इशारा
ही घटना केवळ एका मुलीच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही. ही चेतावणी आहे – आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नका.
“ही काही शेवटची परीक्षा नव्हती…”
शैक्षणिक अपयश हे आयुष्याचं अपयश नसतं. अतीमहत्त्वाकांक्षा आणि ताण यामुळे आज अनेक मुले नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. ही अमानुष घटना समाजाने, पालकांनी आणि शिक्षकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ दर्शवते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे