झाशीच्या राणीच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा शंखनादाने अभिवादन

झाशीच्या राणीच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा शंखनादाने अभिवादन
पुणे | १८ जून २०२५:
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय शौर्याची प्रतीक आणि आजही महिलांचे प्रेरणास्थान असणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्यावतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी झाशीच्या राणीच्या शौर्याला आणि मनोधैर्याला शंखनाद करत आगळीवेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेश कार्याध्यक्ष मयुरेश अरगडे, प्रदेशाध्यक्षा विद्या घटवाई, जिल्हा उपाध्यक्ष निनाद जोशी, महिला जिल्हा उपाध्यक्ष रूपाली जोशी तसेच नीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्रद्धा डिंगणकर आणि श्वेता निलंगे या द्वयीने उत्स्फूर्त शंखनाद सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. त्यांच्या या विशेष सहभागाबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनाने ऐतिहासिक स्मरणोत्सवाला आधुनिक आणि सांस्कृतिक रूप दिले.
राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करत महाराष्ट्र ब्राह्मण सभेने समाजात राष्ट्रभक्ती, महिलासक्षमीकरण आणि ऐतिहासिक जाणीवेला जागृत ठेवण्याचा एक सकारात्मक संदेश दिला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे 9822548429