एअर विमान कोसळलं गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
एअर इंडियाचे लंडनला 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं
गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीतच कोसळल आहे.
एअर इंडियाचे या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळले. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून 10 क्रू मेंबरांसह तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिथे प्लेन क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथून उड्डाण घेणारे एअर इंडियाचे हे विमान बोईंग कंपनीचे 787-8 ड्रीमलायनर हे विमान होते. हे विमान 11 वर्षे जुने होते.
अहमदाबाद विमान अपघातात 169 भारतीयांसह तब्बल 61 परदेशी नागरिकांचा समावेश, एकट्या ब्रिटनचे 53 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते.