महाराष्ट्र ग्रामीण

वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार

वैष्णवी हगवणे प्रकरणात पाच आरोपींपैकी तीन जण अटकेत आहेत .यात सासू , नणंद आणि पतीचा समावेश आहे .सासरे राजेंद्र हगवणे व इतर आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची एक टीम कार्यरत आहे

Rupali Chakankar On Rohini Khadse: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे . सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे सदस्य असल्याने या प्रकरणाने आता राजकीय वातावरणही तापले आहे. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेला जमीन खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणायला लावले .या घटनेनंतर दररोज या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत .

दरम्यान, शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर खरमरीत टीका केली होती .’आपल्या महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागनं घोडं . बरं बाईचा अविर्भाव पण असा की जणू कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहोत.. दाल में कुछ काला है.’ असे त्या म्हणाल्या होत्या .शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या या टीकेला आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलंय . काही विरोधक घटना घडल्यावरच जागे होतात .सोशल मीडिया आणि ट्विटरवर पहिला दिवसापासून संपूर्ण माहिती उपलब्ध आहे .माझं नाव घेतलं म्हणजे तुमची बातमी झाली . असे त्या म्हणाल्या ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button